Sun, Aug 18, 2019 20:34होमपेज › Satara › साताऱ्यात नवीन बुलेट पेटवली

साताऱ्यात नवीन बुलेट पेटवली

Published On: Apr 25 2018 12:50PM | Last Updated: Apr 25 2018 12:49PMकोडोली : वार्ताहर

सातारा शहरालगतच्या संभाजीनगरमधील बारावकरनगर येथे बुलेट गाडी अज्ञाताने पेटवून दिली. आज (बुधवार) पहाटे ऋषीकेश लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या मालकीची ही गाडी घरासमोर लावली असताना अज्ञातांनी ती पेटवली. या प्रकारमुळे संभाजीनगरात तणावाचे वातावरण आहे. पुणे-मुंबईत सध्या अशा प्रकारे गाड्या पेटवण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना आता साताऱ्यातही घडली आहे.

मंगळवारी रात्री सुर्यवंशी यानी आपली बुलेट गाडी (क्रमांक एम एच ११सी ई४६६४) घरासमोर लावली होती. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घराच्या खिडकीतून गाडी जळत असल्याचा धूराचा वास मोठ्या प्रमाणात आल्याने त्यानी दार उघडले असता बुलेटला आग लागल्याचे त्यांना दिसले. गाडी जळत असल्याचे दिसल्याने त्यांनी आरडाओरड केला. त्यावेळी तेथे जमलेल्या काही लोकांनी घरातल्या पाण्याणे आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गाडी बर्‍याचअंशी झळाली होती. 

Tags : bullet burn, satara, sambahajinagar, satara news