Fri, Jul 19, 2019 01:29होमपेज › Satara › सिंदखेडराजा येथे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

सिंदखेडराजा येथे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:26PM

बुकमार्क करा
बुलडाणा/सातारा : प्रतिनिधी

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजन समितीच्यावतीने शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा जि. बुलडाणा  येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा जन्मोत्सव सोहळा दुपारी 3 ते 6 यावेळी शिवधर्म पीठ येथे होणार असून या सोहळ्यास सातार्‍याचे  खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्यासह  खा. छ. संभाजीराजे भोसले, छ. बाबाजीराजे भोसले, माजी खासदार शिवश्री नाना पटोले, छत्रपती फौंडेशन न्युयॉर्क अमेरिकेचे संस्थापक शिवश्री स्वप्नील खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर मेहेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान शिवश्री  व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर भुषवणार आहेत. यावेळी मराठा विधिज्ञभुषण पुरस्कार शिवश्री अ‍ॅड. मिलिंद पवार, मराठा शिवशाहीर पुरस्कार शाहीर विजय तनपुरे व मराठा उद्योगभुषण पुरस्कार शिवश्री संजय वायाळ यांना देवून गौरवण्यात येणार आहे. तरी सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.