होमपेज › Satara › मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्‍यू 

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्‍यू 

Published On: Feb 21 2018 10:48AM | Last Updated: Feb 21 2018 11:06AMकोरेगाव : प्रतिनिधी 

कोरेगाव येथे आज सकाळी सहाच्या सुमारास कोरेगाव-सातारा रस्त्यावर जुन्या ल्हासुरणे फाट्यासमोर "मॉर्निंग वॉक"ला चाललेल्या युवकाला अनोळखी वाहनाने ठोकर दिली. यामध्ये  तो जागीच ठार झाला. गणेश विश्वासराव बर्गे असे युवकाचे नाव असून त्याचे आज दुपारी कोरेगाव येथील एका मंगल कार्यालयात लग्न होणार होते. 

मंगळवारी सायंकाळी या युवकाची शहरात ग्रामदैवतांच्या देवदर्शनासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी सहाच्या सुमारास  ल्हासुरणे फाट्यासमोर "मॉर्निंग वॉक"ला चाललेल्या गणेशवर काळाने घाला घातला.