Sun, Jul 21, 2019 00:15होमपेज › Satara › सातारा : ट्रॅक्टर ट्रालीखाली सापडून शाळकरी मुलगा गंभीर

सातारा : ट्रॅक्टर ट्रालीखाली सापडून शाळकरी मुलगा गंभीर

Published On: Feb 22 2018 6:52PM | Last Updated: Feb 22 2018 6:52PMलिंब : वार्ताहर

सातारा तालुक्यातील लिंब येथे ट्रॅक्टर ट्रालीखाली सापडून शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. समर्थ शिवाजी बिचुकले (वय ६) असे जखमी मुलाचे नाव आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ( एम एच ११ बी ए ७८०८ ) हा लिंब कडून पाटखळमाथा रस्त्याने जात असताना खंडोबानगर ( लिंब ) येथे ट्रालीच्या मागील चाकाखाली समर्थ सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.