Fri, Nov 16, 2018 11:17होमपेज › Satara › बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:07PMकुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ, ता. जावली येथील ज्योती नंदकुमार पवार (वय 16) या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी कुडाळ नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कुटूंबियांना एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये ज्योतीने  दहावीला अपेक्षित गुण न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. 

ज्योतीने दहावीची परिक्षा दिली असून तिला 77 टक्के गुण मिळाले. दहावीचा निकाल लागल्यानंतर मात्र कमी गुण मिळाल्याने ती शांत होती. रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास उठली. आजीला अंघोळीला पाणी दिल्यानंतर नळाचे पाणी भरते असे सांगून घराबाहेर गेली. ती परत आलीच नाही.   

दहावीला कमी गुण मिळाले या नैराश्यातून ज्योती रविवारी बेपत्ता झाली. याबाबतची माहिती कुटूंबियांनी पोलिसांना दिली. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत होते. रविवारी दिवसभर तपास केल्यानंतरही ज्योतीचा सुगावा लागला नव्हता. सोमवारी सकाळी कुडाळी नदीमध्ये केवड्याच्या ओढा हद्दीत नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेवून शवविच्छेदनास दिला.