Tue, May 21, 2019 22:53होमपेज › Satara › दुचाकीची कंटेनरला धडक; दोन युवक ठार

दुचाकीची कंटेनरला धडक; दोन युवक ठार

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:22PMभुईंज : वार्ताहर 

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाले. नीलेश मुरलीधरन फरांदे (वय 35) व अजित भालचंद्र फरांदे (36, दोघेही रा. आनेवाडी, ता. जावली) अशी मृत तरुणांची नावे आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री कंटेनर (एमएच 46 - एच 546) पुण्याकडून सातार्‍याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी पाचवडनजीक दुचाकी (एमएच 11- सीएम 0435) ही सातार्‍याच्या दिशेने जात होती. मात्र, पाचवडनजीक दुचाकीआल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकी कंटेनरवर जाऊन आदळली. या अपघातात निलेश व अजित फरांदे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

याप्रकरणी पोलिसांनी नानासो उत्तम कोडग (वय 26 रा. अवंडी ता.जत जि. सांगली) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात करण्यात आली असून तपास सपोनि बाळासाहेब भरणे करत आहेत. दरम्यान, ज्या कंटेनरला धडकून हा अपघात झाला. त्या कंटेनरच्या मागे लॅम्प रिफ्लेक्टर लावण्यात आलेला नव्हता. हा कंटेनर पुण्याकडून आला असताना शिरवळ, खंडाळा, जोशी विहिर येथे महामार्ग पोलिसांनी नक्की कोणती तपासणी केली? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. तर दोन्ही जखमींना वेळेत योग्य ते उपचार न मिळू शकल्याने तरूणांचा जीव गेला. त्यामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी ग्रामीण रूग्णालय कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.