Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Satara › बहुजनांची चळवळ उभी करू : डॉ. भारत पाटणकर 

बहुजनांची चळवळ उभी करू : डॉ. भारत पाटणकर 

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:00PM

बुकमार्क करा
तारळे : वार्ताहर

देशात समानतेची संस्कृती संपवण्याचा डाव आखला जात आहे. तो डाव हाणून पाडत कष्टकरी जनतेची, बहुजनांची समृद्ध संस्कृती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल चळवळ निर्माण करेल, अशी ग्वाही डॉ. भारत पाटणकर यांनी दिली आहे.

सावरघर (ता. पाटण) येथे येथील तीन दिवसीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष  कॉ. वाहरु सोनावणे, डॉ. प्रशांत पन्हाळकर, कॉ. संपत देसाई, आनंदराव पाटील, चैतन्य दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पाटणकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य त्यागातून मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतर शेतकरी, कामगार हित साधले जाईल, अशी अपेक्षा होती. पण स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. देशातील भांडवलदारांना हद्दपार करून शेतकरी व कष्टकरी यांच्या हातात नैसर्गिक संसाधने व शेतीवर पर्यावरण संतुलित उद्योग निर्माण करावेत, अशी आमची भूमिका आमची आहे.

सोवळे या गोंडस नावाखाली कुलदेवतांना बहुजनांपासून तोडाण्याचा कुटील डाव चळवळ उभी करुन हाणून पाडू. अनेक निर्णय हुकूमशाही पद्धतीने घेतले जात आहेत. सरकार आणि सरकार बाहेरील हुकूमशाही प्रवृत्तीला गाडून टाकू. आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढत चालली असून भांडवलदार देश चालवत आहेत. तसेच आगामी निवडणुकीत संघटना निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्‍वासही डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, आनंदराव पाटील, चैतन्य दळवी, संपत देसाई, वाहारु सोनावणे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली.