Mon, Mar 25, 2019 05:29
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कराडः जोतिबाला जाताना दुचाकीचा अपघात; एक ठार

कराडः जोतिबाला जाताना दुचाकीचा अपघात; एक ठार

Published On: Aug 27 2018 4:38PM | Last Updated: Aug 27 2018 4:38PMकराडः प्रतिनिधी 

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) येथील दुचाकी अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवार दि. २६ रोजी रात्री सव्वानऊ वाजता हा अपघात झाला. अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या अपघातात आत्माराम विठ्ठल सावंत (वय ४४, रा. आंबेवाडी, ता. पाटण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विकास बापुराव सावंत (वय ३०, रा. आंबेवाडी) असे जखमींचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आंबेवाडी येथील आत्माराम सावंत व विकास सावंत हे दोघे दुचाकीवरून जोतिबाला देवदर्शनासाठी जाते होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. भरपूर पाऊस असल्यामुळे त्यांची दुचाकी घसरून हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड व अपघात विभागाचे शेख, इनामदार यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला. या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.