होमपेज › Satara › मतभेदांमुळे चाफळच्या विकासाला खीळ

मतभेदांमुळे चाफळच्या विकासाला खीळ

Published On: Jan 14 2018 10:52AM | Last Updated: Jan 14 2018 10:52AM

बुकमार्क करा
चाफळ : राजकुमार साळुंखे

चाफळ (ता. पाटण) येथील श्रीराम मंदिरास ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र गेल्या सहा  वर्षाच्या कालावधीत राजकीय  कुरघोड्यामुळे व विश्‍वस्थांच्या दुर्लक्षामुळे शासनस्तरावर कागदपत्राची पूर्तताच  होत नाही. त्यामुळे चाफळच्या विकासासाठी निधीच उपलब्ध होत नसून ग्रामस्थांसह राज्याच्या  कानाकोपर्‍यातून येणार्‍या भाविकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन  चाफळमधील राजकीय नेत्यांनी एकत्र बसून पर्यटन ‘ब’ वर्गाचा निधी मिळवण्यासाठी सर्वानुमते प्रस्ताव तयार  करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तो शासनाकडे सादर केल्यास निधी मिळण्यास कोणतीच अडचण निर्माण  होणार नाही. यापूर्वी ज्यांनी पर्यटन निधी मिळवण्यात  मोलाचा वाटा उचलला होता,  त्यांनीही यासाठी पुढाकार घेणे आज गरजेचे बनले आहे. 

याशिवाय देवस्थान  विश्‍वास्थांची दर महिन्यास होणारी मासिक बैठक तार्‍याऐवजी चाफळ येथील मंदिरात होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास भाविकांना भेडसावणार्‍या  अडचणी  हून त्यावर लगेच निर्णय होऊन त्या सोडवता येऊ शकतात. अनेक विश्‍वस्त हे बाहेर गावचे असल्याने त्यांची  मंदिरास अल्प प्रम ाणात होते. सध्यस्थितीत चाफळमधील दोनच ग्रामस्थ विश्‍वस्थाच्या संचालक मंडळात  आहेत. श्रीराम मंदिरास पर्यटनस्थळाचा  ब वर्गाचा दर्जा मिळवण्यास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा  मोलाचा वाटा होता. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनीही निधी मिळवण्यासाठी सनास हवी असलेली सर्व कागदपत्रे वेळोवेळी सादर केल्यानेच मंदिरास पर्यटन ब वर्ग दर्जा मिळाला. त्यानंतर पहिल्याच  वर्षी दोन कोटी रुपयाचा निधी  शासनाकडून मंजूर झाला. त्यातून मंदिर परिसराचा अक्षरश:कायापालट झाला होता. गेल्या सहा वर्षापासून निधी मिळवण्यात  मात्र ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त कमी पडले आहेत, हे मान्यच करावे लागेल. 

दोन महिलांचा विश्‍वस्तांमध्ये समावेश व्हावा...

विश्‍वस्तांमध्ये दोनच स्थानिक विश्‍वस्तांचा समावेश आहे.  विश्‍वस्त मंडळात स्थानिक एकाही महिला पदाधिकार्‍याचा समावेश नाही. मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या  महिलांना अडचण निर्माण झाल्यास ती सोडवणे जवळपास अशक्य बनते. या गोष्टी विचारात घेऊन श्रीराम देवस्थानमध्ये दोन स्थानिक महिलांची