Thu, Jul 18, 2019 04:12होमपेज › Satara › जनरेटरच्या धुरामुळे चार विद्यार्थिनी गुदमरल्या

जनरेटरच्या धुरामुळे चार विद्यार्थिनी गुदमरल्या

Published On: Mar 18 2018 1:05AM | Last Updated: Mar 17 2018 11:07PMउंब्रज : प्रतिनिधी

उंब्रज (ता. कराड) येथील म. गांधी ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी बोर्ड परीक्षेच्या महिती-तंत्रज्ञान या विषयाच्या ऑनलाईन पेपरदरम्यान जनरेटरच्या धुराने चार परीक्षार्थी विद्यार्थिनी गुदमरल्यामुळे त्यांना उपचारासाठी उंब्रज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दुपारी 1 वा.च्या सुमारास घडली. दरम्यान, चारही विद्यार्थिनींच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

माहिती-तंत्रज्ञानच्या परिक्षेसाठी एकूण 7 विद्यार्थीनी बसल्या होत्या. पेपर सुरू झाल्यानंतर वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. ही परिक्षा संगणकावर ऑनलाईन होत असल्यामुळे कॉलेज प्रशासनाने विद्यार्थी यांचे नुकसान होवू नये म्हणून जनरेटरची व्यवस्था केली. संबंधित ऑनलाईन पेपरचा कालावधीत संपत आला असताना जनरेटरच्या धुराचा त्रास विद्यार्थीनीना  झाला. त्यामध्ये 4 विद्यार्थीनी जनरेटरच्या धुरामुळे  गुदरमरल्या. 

त्यानंतर त्यांना तातडीने उंब्रज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील स्मिता संपत यादव, वेदांतिका मुकुंद गोरे, शिवानी महेश कदम यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर ऋतुजा राजेंद्र साळुंखे हिच्यावर जनरल वार्ड मध्ये उपचार सुरू आहेत.

 

Tags : satara, satara news, generators smock, student, student choked,