Tue, Nov 13, 2018 23:33होमपेज › Satara › सातारा जिल्हा बँकेस ‘बँको 2017’ पुरस्कार

सातारा जिल्हा बँकेस ‘बँको 2017’ पुरस्कार

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 9:59PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा बँको पुरस्कार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस जाहीर झाला आहे. दोन्ही संस्थांच्या तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार 5 हजार कोटींपेक्षा जास्त असलेल्या बँकांमधून जिल्हा बँकेची निवड केली. 

मूल्यांकनामध्ये प्रामुख्याने ठेवी व कर्जे, निधी नियोजन, एनपीए या बाबींचा समावेश आहे. जिल्हा बँकेस या संस्थेने 2013-14 मध्ये तसेच सहकारी बँकिंग तंत्रज्ञानातील उल्लेखनीय कामगीरीबद्दल प्रथम क्रमांकाचा ‘बँको टेक्नॉलॉजी पुरस्कार - 2016’ व ठेव संकलनाकरता व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवले आहे़

याबद्दल संचालक ना. रामराजे ना. निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील (तात्या), आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार विलास पाटील-उंडाळकर, प्रभाकर घार्गे, उपाध्यक्ष सुनिल माने, दादाराजे खर्डेकर यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एस. एन. जाधव, एम. व्ही. जाधव आदींनी अभिनंदन केले.