Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Satara › तडीपारमधील गुंडाला साताऱ्यातून अटक

तडीपारमधील गुंडाला साताऱ्यातून अटक

Published On: May 29 2018 1:50PM | Last Updated: May 29 2018 1:50PMसातारा : प्रतिनिधी

सदरबाझार, सातारा येथील तडीपार संशयित आरोपी संजय एकनाथ माने (वय ४२, रा. भीमाबाई झोपडपट्टी, सदरबाझर) याला त्याच्या रहाते घरातून मंगळवारी पहाटे दोन वाजता ऑल आऊट ऑपरेशनमध्ये सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला दि. १५ रोजीच तडीपार केले असतानाही तो साताऱ्यात फिरत होता. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकारणीचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय माने याच्यावर सुमारे १० विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र सोमवारी रात्रगस्तीमध्ये सातारा पोलीसांनी माने  याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. घराची तपासणी केली असता तो घरी आढळून आला. 

पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल स्वामी, अमोल साळुंखे, धीरज कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.