Fri, Sep 21, 2018 23:31होमपेज › Satara › कास पठारा लगतच्या जंगलात समाजकंटकांकडून वणवा

कास पठारा लगतच्या जंगलात समाजकंटकांकडून वणवा

Published On: May 01 2018 6:51PM | Last Updated: May 01 2018 6:51PMबामणोली : वार्ताहर

जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारा लगतच्या जंगलात समाजकंटकांकडून वणवे लावण्याचे प्रताप सुरूच आहेत. आज मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञातांनी घाटाई फाटा ते घाटाई देवी मंदिर या रस्त्याच्या कास पठाराकडील बाजूच्या जंगलात वणवा लावला. या वणव्यात हजारो छोटे छोटे वृक्ष जळून खाक झाले.

वणवा लागल्याची माहिती कास कार्यकारी समितीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी तात्‍काळ वनव्याच्या दिशेने धावा घेतली. कास पठाराच्या मुख्य बाजूला वणवा येऊ नये याकरिता कर्मचारी प्रयत्न करीत होते. या वणव्यात मोठी जलसंपदा नष्ट झाली. दरम्‍यान समाजकंटकांकडून वारंवार लावल्‍या जाणार्‍या या वनव्यामुळे वनव्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या आगी लावणार्‍या समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.