Thu, Jan 24, 2019 08:32होमपेज › Satara › कराड : १२ जानेवारीपासून बलशाली युवा हृदय संमेलन

कराड : १२ जानेवारीपासून बलशाली युवा हृदय संमेलन

Published On: Jan 02 2018 7:07PM | Last Updated: Jan 02 2018 7:07PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

घारेवाडी (ता. कराड) येथे 12 जानेवारीपासून शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने बलशाली युवा हृदय संमेलनास प्रारंभ होत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू कुलकर्णी यांनी दिली.

संस्कारक्षम युवा पिढी घडवण्यासाठी या संमेलनात विविध कार्यक्रमांचे, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते शेतकरी ज्ञानेश्वर बोडके, अमरावती येथील प्रयास सेवांकुरचे संस्थापक डॉ अविनाश सावजी, अशोक खाडे, श्रीमती उज्ज्वला धर पाटील, जळगाव येथील दीपस्तंभचे संस्थापक युजवेंद्र महाजन, चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते शिरीष काटकर यांच्यासह विविध विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 12 जानेवारी ते 14 जानेवारी या तीन दिवसात हे संमेलन आयोजित करण्यात आले असून समारोप इंद्रजीत देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात सुमारे तीन ते चार हजार युवक युवती प्रतिभा देवीसिंह सहभागी होणार आहेत अशी माहिती  डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली. यावेळी संजय पाटील यांच्यासह शिवम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.