Thu, Jan 24, 2019 18:14होमपेज › Satara › संदीप मोझर निश्‍चितपणे आमच्या सोबत येतील : बाळा नांदगावकर(video)

संदीप मोझर निश्‍चितपणे आमच्या सोबत येतील : बाळा नांदगावकर(video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

सातार्‍याचे संदीप मोझर यांच्यावर पक्षाचा विश्‍वास होता. त्यामुळेच त्यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवण्यात आली होती. एखादा कार्यकर्ता नाराज होऊन गेला तर मलाही त्याचे वाईट वाटतेच की, असे सांगत त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते भविष्यात आमच्या पक्षासोबतच निश्‍चितपणे येतील, असा विश्‍वास माजी आमदार, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनीही मोझर यांना पक्षात घेऊ नये, यासाठी आपल्याशी संपर्क साधला होता. मात्र ते न ऐकता आपण मोझर यांना पक्षात घेतले होते, असा गौप्यस्फोटही बाळा नांदगावकर यांनी यावेळी केला आहे.

बुधवारी कराडमध्ये कराड दक्षिण, पाटण तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना संदीप मोझर यांनी आपल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आपणास त्याचे काहीच वाईट वाटण्याचे कारण नाही. ज्या पक्षात मतभेद नाहीत अथवा कोणी नाराज नाही असे दाखवा असे प्रतिप्रश्‍न करत पक्षात हे होतच असते. कदाचित मी चुकलोही असेन, असे सांगत स्वतः पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी सातार्‍यात सभा घेतली आहे. संदीप मोझर यांच्याशी त्यांची चर्चाही झाली असल्याचे नांदगावकर यांनी सांगून यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच संदीप मोझर यांनी पक्षाचे काम करत रहा, राजीनामे देऊ नका, असेही कार्यकर्त्यांना सांगितले आहे, हेही नांदगावकर सांगण्यास विसरले नाहीत.


  •