होमपेज › Satara › नागठाणेत दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

नागठाणेत दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नागठाणे : वार्ताहर     

नागठाणे येथील दोन दुकानांना रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे 8 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.  दरम्यान, दोन्ही दुकाने या आगीत जळून खाक झाली. 
श्री चौंडेश्‍वरी देवीच्या 

मंदिरासमोर आलेल्या मकरंद मनोजकुमार वेळापुरे  यांच्या वेळापुरे किराणा स्टोअर्स व दीपक लहू साळुंखे यांच्या अंबिका किराणा स्टोअर्स ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती कळताच बोरगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आवाजाने रात्री सर्व लोक जागे झाले. लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठी असल्याने अजिंक्यतारा कारखान्याची फायर ब्रिगेडची गाडी बोलावण्यात आले. त्यानंतर उशीरा ही  आग आटोक्यात आली.

या आगीमध्ये मकरंद वेळापुरे यांच्या दुकानातील दोन फ्रीज, एक आटा चक्की, एक झेरॉक्स मशीन, फर्निचर, किराणा माल, भुसार माल असे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. तसेच या आगीत दीपक लहू साळुंखे यांच्या आंबिका किराणा स्टोअर्स मधील एक फ्रीज, एक टीव्ही, 2 इलेक्ट्रीक वजन काटे किराणा व भुसार माल असे मिळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचे नेमके  कारण समजू शकले नाही. 

Tags : satara, satara news, Furious fire, two shop, Nagthane,


  •