Thu, Jul 18, 2019 02:34होमपेज › Satara › शिक्षकाच्या डोक्यात घातला दगड

शिक्षकाच्या डोक्यात घातला दगड

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:27PMपाटण : प्रतिनिधी

पाटण तालुक्यातील सांगवड मार्गे बहुलेकडे जाणार्‍या भरळी घाटात दुचाकीस्वाराने शिक्षकाच्या दुचाकीला लाथ मारून शिक्षकाच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये शिक्षक अरुण भिकाजी पानस्कर (वय 41) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (दि. 23) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अरुण भिकाजी पानस्कर हे माध्यमिक शिक्षक असून ते पाटण तालुक्यातील बहुलेश्‍वर विद्यालय बहुले येथे कार्यरत आहेत. सोमवारी ते पाटणहून सांगवड मार्गे बहुले येथे  शाळेत निघाले असताना सकाळी या मार्गावरील भरळी घाटात पाठीमागून येणार्‍या अज्ञात मोटारसायकलस्वाराने अचानक शिक्षकाच्या दुचाकीला लाथ मारून पानस्कर यांची गाडी रस्त्यावर पाडली. त्यानंतर संबंधिताने पानस्कर यांच्या डोक्यात दगड घालून तेथून पलायन केले. यामध्ये पानस्कर गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान, या घटनेची नोंद पाटण पोलिसांत झाली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार के. आर. खांडे करीत आहेत.

 

Tags : satara, Patan news, crime,  school teacher, stone,