Tue, Mar 26, 2019 07:38होमपेज › Satara › एसीबीला डीवायएसपी अशोक शिर्के यांची नियुक्ती

एसीबीला डीवायएसपी अशोक शिर्के यांची नियुक्ती

Published On: Jun 22 2018 2:51PM | Last Updated: Jun 22 2018 2:51PMसातारा: प्रतिनिधी

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) डीवायएसपी पदी अशोक शिर्के यांची नियुक्ती करण्यात असून, शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीचे डीवायएसपी सुहास नाडगौडा यांची पुणे येथील एसीबी विभागात बदली झाली आहे.

सुहास नादगौडा गेल्‍या तीन वर्षापासून साताऱ्यात कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक धडाकेबाज कारवाया झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केल्या आहेत. 

पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के हे पुणे येथील एसीबी विभागात कार्यरत होते. त्यांची सातारा येथे तर त्यांच्या जागी नादगौडा यांची बदली झाली आहे. दोघांनीही आज शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे.