Thu, Mar 21, 2019 11:11होमपेज › Satara › सातारा : कराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी

सातारा : कराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी

Published On: Jul 23 2018 9:37AM | Last Updated: Jul 23 2018 10:39AMकराड : प्रतिनिधी 
आषाढी एकादशीनिमित्त सकाळी कराड शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, रुक्मिणी यांच्यासह विविध साधु संताच्या वेषभूषा साकारत मंगळवार पेठेतील संत सखुबाई, भाजी मंडई परिसरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. 

सामाजिक समतेचा संदेश आणि पिढ्यानपिढ्या जोपासल्या जाणाऱ्या वारकरी सांप्रदायिक परंपरेचे दर्शन घडवत कराडमधील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती शिशुवाटिकेतील मुक्तांगण, छोट्या आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी संत सखुमाई मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. तर पहिली ते चौथीपर्यंतच्या सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भाजी मंडई परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत अखंड हरिनामाचा गजर करत पायी दिंडी काढली. 

त्याचबरोबर कराड शहरासह तालुक्यातील विविध मंदिरातही दर्शनासाठी दिवसभर गर्दी पहावयास मिळत होती.