Tue, Jun 18, 2019 22:32होमपेज › Satara › जिल्ह्याचा ३२२ कोटींचा वार्षिक आराखडा 

जिल्ह्याचा ३२२ कोटींचा वार्षिक आराखडा 

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 8:37PM

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर 

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाने सुमारे चार तास जिल्हास्तरीय सर्व अधिका-यांची बैठक घेऊन या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाचे सदस्य आ. शंभूराज देसाई व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सन 2018-19 करीता जिल्हयाचा 322 कोटी रुपयांचा वाढीवसह जिल्हा वार्षिक आराखडा तयार केला आहे. या 322 कोटींच्या जिल्हा वार्षिक प्रारुप आराखडयामध्ये 243.65 कोटी रुपयांची वित्तीय मर्यादा शासनाने ठरवून दिली असून 120 कोटींचा वाढीव निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन भवनात आयोजित या बैठकीस जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाचे सदस्य आ.शंभूराज देसाई, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल, सदस्य जि.प. सदस्या प्रियंका ठावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे.जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, समाजकल्याण सहाययक आयुक्त गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. प्रथमत: सन 2017-18 करिता शासनाकडून देण्यात आलेल्या 243.65 कोटी रुपयांच्या मंजूर निधीतील किती कामे सुरु झाली, किती निधी या वर्षात खर्च केला.  

सन 2018-19 या आर्थिक वर्षातील कामाकरीता त्या त्या विभागाकडून किती रक्कमेची मागणी करण्यात आली आहे. याचा विभागवार आढावा घेण्यात आला. यामध्ये ज्या यंत्रणांनी अद्यापही सन 2017-18 करीता देण्यात आलेला निधी खर्च केला नाही अशा यंत्रणांना आ. देसाई व जिल्हाधिकारी यांनी वेळेत निधी खर्च करण्याच्या सुचना दिल्या. सन 2018-19 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये गाभा क्षेत्रामध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास व सामुहिक विकास तसेच सामाजिक व सामूहिक सेवा व पाटबंधारे व पुरनियंत्रणाकरिता 143.68 कोटी व बिगर गाभा क्षेत्रातील ऊर्जा विकास, उद्योग व खाणकाम, परिवहन- वाहतूक दळणवळण, सामान्य सेवा व सामान्य आर्थिक सेवा याकरिता 53.06 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित केला आहे.

तसेच केंद्र पुरुस्कृत योजनेसाठी 42.59 कोटी, सन 2018-19 करीता 243.65 कोटी रुपयांची वित्तीय मर्यादा शासनाने ठरवून दिली आहे यामध्ये सुमारे 120 कोटी रुपये वाढीवचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक आराखडयाकरीता मिळावा याकरीता राज्य शासनाकडे मागणी करण्यात येण्याचे यावेळी ठरविण्यात आले तर आ. शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी यांनी या जिल्हा वार्षिक आराखडयास 120 कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मिळणेकरीता राज्याचे वित्त मंत्री यांचेबरोबर बैठक आयोजीत करुन या निधीची मागणी करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.