Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Satara › फलटणला गो शाळेतील जनावरे मृत (video)

फलटणला गो शाळेतील जनावरे मृत (video)

Published On: Jan 24 2018 11:13PM | Last Updated: Jan 25 2018 10:59AMसातारा : प्रतिनिधी 

फलटण येथील सकल जैन समाज गो शाळा ट्रस्टमध्ये जनावरांची योग्य देखभाल होत नाही. या गो शाळेत काही जनावरे मृत आढळून आल्याने या ट्रस्टची सखोल चौकशी करण्याची मागणी श्रीकांत विजय पालकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी  केली. पालकर यांनी  22 जानेवारीला प्रत्यक्ष गो शाळेचा व्हिडिओ जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  फलटण सातारा रस्त्यालगत असणाऱ्या संत बापुदास नगर येथील सकल जैन गोशाळा व वन गोशाळामध्ये साधारण 20 ते 25 जनावरे असून यात गाई, उंट, हंस असून त्यांची देखभाल योग्य प्रकारे झाली नसल्यामुळे काही जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. काही मृत्यू अवस्थेकडे जात आहेत तरी या ट्रस्टचे चालक मालक यांनी वेळोवेळी जनतेला भुलवून यांच्याकडून जो निधी गोळा केला त्यांची सखोल चौकशी व्हावी. या गो शाळेत गोहत्या होत असल्याची शंका असून भारतीय दंड कलम 429, महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायदा 1976 कलम 5,9,11 प्राण्यास निर्दयपणे वागवणे प्रतिबंध कायदा 1960 कलम 11/5 यानुसार चौकशी करावी. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकर यांनी केली आहे. सदर तक्रार अर्ज पशुसंवर्धन संवर्धन विभाग, सातारा जिल्हा पोलिस प्रमुख, धर्मादाय आयुक्त सातारा, फलटण शहर पोलिस ठाणे, उपविभागीय अधिकारी फलटण यांना निवेदन अर्ज सादर केले आहेत.