Fri, May 24, 2019 06:35होमपेज › Satara › सातारा : मलकापूरमध्ये ओबीसींवर अन्याय; विरोधकांचे उपोषण(Video)

सातारा : मलकापूरमध्ये ओबीसींवर अन्याय; विरोधकांचे उपोषण(Video)

Published On: May 03 2018 3:51PM | Last Updated: May 03 2018 3:55PMकराड : प्रतिनिधी 

मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) नगरपंचायतीला "क' वर्ग नगरपालिकेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यामागे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पडलेले इतर मागासवर्गाचे आरक्षण बदलण्याचा डाव आहे. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण नगरपालिकेचे निमित्त पुढे करून कोणत्याही गटातून तसेच पक्षातून पाच वर्षासाठी नगराध्यक्ष होण्याची संधी इतर मागासवर्ग समाजापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ओबीसी समाजाकडून करण्यात आला. त्यासाठी मलकापूर नगरपंचायतीसमोर गुरूवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

2011 साली झालेल्या जनगणनेनुसार 2013 सालीच मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका होणे आवश्यक होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आमदार पृथ्वीराज चव्हाण कार्यरत होते. मात्र 2017 पर्यंत मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी, म्हणून प्रयत्न केले नाहीत. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर होताच ते रद्द व्हावे, यासाठी मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी, हा मुद्दा समोर आणण्यात आल्याचा दावा करत इतर मागासवर्ग समाजातील नागरिकांनी उपोषण केले.