Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Satara › कोयना धरणातून विसर्ग; प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

कोयना धरणातून विसर्ग; प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

Published On: Jul 17 2018 7:36PM | Last Updated: Jul 17 2018 7:36PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना धरणांतर्गत विभागातील पावसाचा जोर व धरणात प्रतिसेकंद येणारे तब्बल सरासरी 78 हजार 485 क्युसेक्स पाणी व पाणीसाठवण क्षमता लक्षात घेऊन मंगळवारी या धरणातून पाणी सोडण्यात आले. यावेळी धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 व धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फुटांनी वर उचलून त्यातून 5788 असे एकूण 7888 क्युसेक्स पाणी सध्या पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. 

मुळातच पूर्वेकडील विभागात सुरू असणारा पाऊस व नद्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ आणि आता धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे कोयना नदीपात्राने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर्वेकडील नदीकाठच्या गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर याबाबत महसूल, पाटबंधारे, आरोग्य विभागालाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. धरणात आता 77.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.