Mon, Mar 25, 2019 09:38होमपेज › Satara › सातारा : भारतीय वायुसेनेतील जवानाचे  ह्रदयविकाराने  निधन

सातारा : भारतीय वायुसेनेतील जवानाचे  ह्रदयविकाराने  निधन

Published On: Feb 04 2018 7:27PM | Last Updated: Feb 04 2018 7:26PMकोरेगाव : प्रतिनिधी 

जायगाव (ता. कोरेगाव) चे  सुपुत्र आणि भारतीय वायुसेनामध्ये  कार्यरत असलेले घनश्याम शिंदे (वय : ३१) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  घनश्याम भारतीय हवाई दलामध्ये नोकरीला होते. दोन वर्षांपूर्वी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जायगाव गावाने भाग घेतला होता. गावाला पाणीदार करण्याची संधी आलेली आहे, या आशेने घनश्याम रजा काढून गावकऱ्यांसोबत प्रशिक्षणास आले. त्यांनी फक्त प्रशिक्षणच घेतले नाही तर गावाला पाणीदार करण्यात सिहांचा वाटा उचलला. या स्पर्धेत हे गाव राज्यात द्वितीय क्रमांकाने चमकले. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली.