Tue, Jan 22, 2019 03:29होमपेज › Satara › नगरमधील शिवसैनिक हत्याकांडाचा सूत्रधार शोधा .: अजित पवार

नगरमधील शिवसैनिक हत्याकांडाचा सूत्रधार शोधा .: अजित पवार

Published On: Apr 09 2018 11:12AM | Last Updated: Apr 09 2018 11:12AMसातारा : प्रतिनिधी

नगरमध्ये शिवसेना पदाधिकार्‍यांचे जे दुहेरी हत्याकांड झाले त्‍याच्याशी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबध नाही. त्यांना विनाकारण गोवण्यात आले आहे आहे. या खुनाचा सूत्रधार वेगळाच असून पोलिसांनी आता शोध घ्यावा असे अजित पवार यांनी सोमवारी कराड ते पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान या प्रकरणी ज्यांची हत्या झाली आहे त्यांचे  कॉल रेकॉर्ड तपासल्यास सत्य समोरील असेही अजित पवार म्हणाले. 

शिवसेना पदाधिकार्‍यांची झालेली हत्या ही वैयक्तिक कारणातून झालेली असताना याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून संग्राम जगताप यांना अटक केली त्यानंतर पोलीस ठाण्यावर जो हल्ल्याचा प्रकार तो निंदनिय असून  गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी राष्ट्रीय फायदा उठवण्यासाठी हे कृत्य केले आहे. पोलिसांनी त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत.

संग्राम जगताप हे निर्दोष असून पोलीस तपासात हे समोर येईल पण एखाद्याचे राजकीय भवितव्य संपविण्याचे षडयंत्र यातून दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्ष व नेत्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र राष्ट्रवादी सहन करणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला.