Sat, Mar 23, 2019 02:04होमपेज › Satara › साताऱ्यात अंनिसचा निषेध मोर्चा

साताऱ्यात अंनिसचा निषेध मोर्चा

Published On: Aug 20 2018 12:04PM | Last Updated: Aug 20 2018 12:04PMसातारा : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शाहू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ दाभोलकर अमर रहे, मारेकरी सापडले सूत्रधार शोधा, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर, हम सब एक हे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि परिवर्तनवादी समनवय्यक समितीच्यावतीने डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली शाहू चौकापासून सुरू झाली ती पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. 

या रॅलीत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्यप्रधान सचिव प्रशांत पोतदार, डॉ. चित्रा दाभोलकर, प्रसन्न दाभोलकर, वंदना माने, डॉ. दीपक माने, उदय चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विध्यार्थीनी सहभागी झाले होते.