Wed, Apr 24, 2019 15:45होमपेज › Satara › कराड : कृष्णा कारखान्याचा अहवाल पाहून भाष्य - इंद्रजित मोहिते

कराड : कृष्णा कारखान्याचा अहवाल पाहून भाष्य - इंद्रजित मोहिते

Published On: Apr 23 2018 5:30PM | Last Updated: Apr 23 2018 5:30PM 

कराड : प्रतिनिधी 

 यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या कारभाराबाबत आपण ऑक्टोंबरमध्ये भाष्य करणार असल्याची स्पष्टोक्ती कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात  २०१५ मध्ये कारखाण्याची सत्ता हातात घेतलेल्यांना तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या कामाचा अहवाल पाहूनच कारखाण्याबात बोलणार अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.   

मलकापूर (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकारपरिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली. रामराव नांगरे पाटील, प्रमोद पाटील, सुभाषराव पाटील यांच्या काही सहकारीही यावेळी उपस्थित होते. 

डॉ. मोहिते म्हणाले, 2015 साली कारखाना निवडणूक लढवताना कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी आपण तीन वर्ष मुदत देण्याची विनंती सभासदांना केली होती. मात्र निवडणुकीत पराभव झाला म्हणून आपण आपली भूमिका बदललेली नाही. आपण तीन वर्ष पूर्ण होईपर्यंत कारखान्याबाबत कोणतेच भाष्य करणार नाही असे सांगत 2010 ते 2015 या कालावधीत कारखान्याची आर्थिक स्थिती किती डबघाईला आली होती हे आपणास माहिती आहे. त्यामुळेच आपण ऑक्टोंबरमध्ये तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कारखान्याचा अहवाल पाहून कारखान्याबाबत भाष्य करणार असल्याचे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सांगितले आहे. 

गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी यासारख्या विचारवंतांच्या हत्या होऊनही मारेकऱ्यांचा न लागलेला शोध, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न आणि अन्य घडामोडींचे अवलोकन करता लोकशाही धोक्यात आल्याचे पहावयास मिळते. महिलांवरील अत्याचारांसह बलात्काराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळेच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण गावोगावी जाऊन जनजागृती करत संघर्ष करणार असल्याचेही डॉ. मोहिते यांनी सांगितले.