Thu, Jun 20, 2019 01:22होमपेज › Satara › सांगा कुठे अ‍ॅडमिशन घ्यायचे?

सांगा कुठे अ‍ॅडमिशन घ्यायचे?

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 8:02PMरेठरे बु : दिलीप धर्मे

गेल्या पाच ते सात वर्षापुर्वी फस्ट क्‍लासने मुलगा पास झाला की,तो हुशार समजला जात होता पालक,विद्यार्थांच्या आनंदाला तर पारा उरत नव्हता पेढे वाटून सर्वत्र त्यांचे कौतुकही होत असे. परंतु आज हे सारं चित्र बदल्याचे दिसत आहे.उज्वल भविष्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेली शेकडो मुले  ही 90 टक्केच्या वरती गुण मिळवू लागले आहेत.तरी देखील इंजिनिअरींग,वैद्यकिय, बीटेक,बीफॉर्म,नर्सिंगसह अन्य क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी प्रचंड स्पर्धा,व चढाओढ सुरू झाली आहे.त्यामुळे प्रवेशा संबंधी विद्यार्थांसह पालकांच्यात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

ऑनलाईन मेरीट नुसार प्रवेश प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे.परंतु कोणत्या शाखेत व कोठे प्रवेश घ्यायचा या विवंचनेत व चौकशीतच सध्या पालक,विद्यार्थी असल्याचे दिसत असल्याचे वास्तव पुढे येत आहे.देशात सर्वात जास्त म्हणजे साधारण 14 लाख विद्यार्थी हे अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरींग डीग्री व डिप्लॉमा,शाखेला आजही पसंती देत असल्याचे दिसत आहे.त्यापाठोपाठ कृर्षी,फॉर्मासी, मेडीकलकडे कल दिसत आहे.सध्या फ्रुड टेक्नॉलॉजिकला खाद्य पदार्थकडे जास्तच डिमांड वाढत असून तिकडेही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करू लागले आहेत. या शिवाय बीएसी,एमसीए,एमसीए,बीसीए, मॅनेजमेंट बीटेक,तर आयटीआय कडेही विद्यार्थांची चांगलीच पसंती दिसत आहे.शिकण्यासाठी अनेक कॉलेजेस,शाखा व मार्ग असले तरी विद्यार्थांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे.

त्यात उत्तीर्ण होण्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असल्याने प्रवेशामध्ये त्यांनाच जास्त संधी मिळत असल्याने मुलांच्या पुढे अडचणी वाढत आहेत.शिवाय पुर्वी जास्त मागणी व प्रतिष्ठेचे ठरलेले डीएड,व बीएड कॉलेजेस आज बहुतांश ठिकाणी बंद स्थितीत आहेत.असे असले तरी इतर शाखेकडे विद्यार्थांची संख्या ही प्रचंड आहे.त्यात उर्त्तीर्ण होण्याचे प्रमाण हे प्रत्येक वर्षी वाढत असून गर्दीमुळे अनेक कॉलेज मध्ये मेरीट गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत असल्याने अनेकांना आपल्या पसंतीनुसार शाखा व कॉलेज मिळू शकत नाही अशी वस्तुस्थिती समोर येत आहे.आज शासन विशिष्ठ योजनेद्वारे प्रवेश शुल्क मध्ये काही प्रमाणात सुट देत असले तरी शिक्षणासाठी होणार खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा असाच आहे.

विद्यार्थी हुशार व पात्रताधारक असूनही भविष्यातील शैक्षणिक खर्च पेलणारा नाही म्हणून अनेकजण कमी दर्जाचे शिक्षण घेताना दिसत आहेत.शिक्षण म्हणजे करिअर आणि भविष्याचा पाया असे समिकरण असले तरी शिक्षण क्षेत्रात आजची व पुर्वीची स्थिती अत्यंत परस्पर विरोधी झाली आहे.त्यात नेट,सेट,जीईई,एमएससीआयटी,या परिक्षेत विद्यार्थांना उर्त्तीर्ण होणे गरजेचे झाले आहे.10 वी 12 वीत कमी किंवा जास्त गुण पडले तरी वरील परिक्षा या विद्यार्थांच्यासाठी आज महत्वाच्या झाल्या आहेत.त्यामध्ये चांगले गुण पडल नाहीत तर विद्यार्थांच्या उच्च शिक्षणाच्या मार्गात अडचणी निर्माण होत आहेत.हेही नाकारून चालणार नाही.भरमसाठ पैसे मोजून  मुलांना शिक्षण दिले म्हणजे पालकांची जबाबदार संपत नाही हेच आजच्या वस्तूस्थितीचे वास्तव आहे.