सातारा : प्रतिनिधी
ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे आज निधन झाले. सातारा येथील राहत्या घरी त्यांचे गुरुवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गुरुवारी सायंकाळी सात वाजता सातारा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कामथी या त्यांच्या मुळ गावावर शोककळा पसरली आहे.