Tue, May 21, 2019 04:41होमपेज › Satara › पुण्यातील १२ ट्रेकर्संवर सह्याद्री व्याघ्रच्या कोअरमध्ये कारवाई 

पुण्यातील १२ ट्रेकर्संवर सह्याद्री व्याघ्रच्या कोअरमध्ये कारवाई 

Published On: May 02 2018 3:16PM | Last Updated: May 02 2018 3:16PMकराड : प्रतिनिधी 

कोयना (ता. पाटण, सातारा) परिसरातील शिरशिंगे गावाजवळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधून कोकणातील जंगली जयगडकडे (जि. रत्नागिरी) जाणाऱ्या पुण्यातील १२ ट्रेकर्संवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. कोअर झोनमधून विनापरवाना ट्रेकिंग केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला असून, सर्व ट्रेकर्सची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.

तुषार निकम, भालचंद्र गोसावी, सुभाष बडदे, सचिन गायकवाड, मनिष कुलकर्णी, मोहन पुंडे, सदानंद आमृते, राकेश धिमटे, किरण टावरे, संदिप पाटील, अभिजीत ढवळे, विठ्ठल उकरशिट्टी अशी ट्रेकर्सची नावे आहेत.

सोमवारी दुपारनंतर हे ट्रेकर्स पुण्यातून कोयना धरण परिसरात आले होते. धरण परिसरातून सर्व ट्रेकर्स सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये गेले होते. शिरशिंगे गावाजवळ कोअर झोनमध्ये ते मुक्काम करून दुसऱ्या दिवशी जंगली जयगडकडे ट्रेकिंग करण्यासाठी रवाना होणार होते. मात्र, सोमवारी सांयकाळी सातच्या सुमारास याच परिसरात सहाय्यक वनसरंक्षक सुरेश साळुंखे यांच्यासह त्यांचे सहकारी गस्त घालत असताना हे ट्रेकर्सवर त्यांना आढळून आले. साळुंखे यांनी  प्राथमिक चौकशी केल्‍यानंतर त्‍यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले. 

Tags : Koyna dam area, Trekker