होमपेज › Satara › वडूजमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींना जमावाकडून मारहाण(व्हिडिओ)

वडूजमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींना जमावाकडून मारहाण(व्हिडिओ)

Published On: Jan 14 2018 7:54PM | Last Updated: Jan 14 2018 7:55PM

बुकमार्क करा
वडूज : वार्ताहर

खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वडूज पोलिस ठाण्यात बलात्‍काराची तक्रार दाखल झाली आहे. नागेश रमेश थोरवे, योगेश बाळासो लोहार आणि चंद्रकांत सत्यवान खरात अशी बलात्‍कार केलेल्‍या तीन्ही संशयीतांची नावे आहेत.

वडूज पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सुर्याचीवाडी येथे जाऊन तिघा संशयितांना अटक करून वडूज पोलिस ठाण्यात आणले. यावेळी  संतप्त ग्रामस्थांनी संशयितांना मारहाण केली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ जमावास दूर करीत तिघांना जमावाच्या गर्दीतून बाहेर घेत पोलिस कोठडीत नेले.