Fri, Nov 16, 2018 18:04



होमपेज › Satara › कोरेगाव : चंचळीत ऊस ट्रॉलीच्या धडकेत युवक ठार

कोरेगाव : चंचळीत ऊस ट्रॉलीच्या धडकेत युवक ठार

Published On: Jan 17 2018 3:22PM | Last Updated: Jan 17 2018 3:22PM

बुकमार्क करा




पळशी : वार्ताहर

चंचळी ता. कोरेगाव येथील शेतकरी सोपान कदम व मुलगा प्रथमेश कदम हे शेतातून घरी येत होते. यावेळी त्यांना ऊसाच्या ट्रक्टर-ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात प्रथमेश चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर दिलीप कदम हे गंभीर जखमी झाले. 

सोपान पांडुरंग कदम मंगळवारी रात्री 8:30 वा. शेतातून मोटार बंद करून घरी येत होते. यावेळी वीटभट्टी नजिक ऊसाच्या मागील ट्रॉलीची धडक बसून गंभीर जखमी झाले. तर पाठीमागे बसलेला मुलगा प्रथमेश दिलीप कदम (वय 17) चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. त्याच्या अपघाती जाण्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.