Wed, Jan 16, 2019 14:09होमपेज › Satara › साताराः निढळजवळ अपघातात २ ठार, ३ जखमी 

साताराः निढळजवळ अपघातात २ ठार, ३ जखमी 

Published On: Apr 14 2018 8:39PM | Last Updated: Apr 14 2018 8:39PMखटाव : प्रतिनिधी 

सातारा-पंढरपूर राज्यमार्गावरील निढळ (ता. खटाव) येथे वॅगनार कार व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात ज्ञानेश्वर पवार  (वय  41) रा. परतवडी, ता. माण व त्यांची पुतणी प्रिया गजानन पवार (वय १६) ठार झाले. तर पवार यांची पत्नी व दोन मुले जखमी झाली. 

ज्ञानेश्वर पवार यांचा मुंबई येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी ते कुटुंबियांसह व्हॅगनार ( MH 03 CH 4468 ) गाडीतून मुंबईहून माण तालुक्यातील परतवडी या गावी येत होते. निढळ येथे मालवाहू ट्रक ( MH 12 MV 1676 ) आणि पवार यांच्या व्हॅगन आर गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक हिती कि व्हॅगनार गाडीचा चक्काचूर झाला. तर 16 चाकी ट्रक रस्ता सोडून खाली गेला.  

अपघातातील जखमी ज्ञानेश्वर पवार आणि प्रिया पवार यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अन्य जखमींना साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.