Wed, Feb 20, 2019 08:44होमपेज › Satara › सातारा : कार-ट्रक अपघातात तीन युवक ठार

सातारा : कार-ट्रक अपघातात तीन युवक ठार

Published On: Feb 19 2018 3:16PM | Last Updated: Feb 19 2018 3:16PMसातारा : प्रतिनिधी

पुणे-बंगळूरू महामार्गावर खोडद (ता.सातारा) गावाच्या हद्दीत  स्‍विप्ट कार आणि ट्रकमध्ये झालेल्‍या अपघातात तीन युवकांचा मृत्‍यू झाला आहे. हे तिघेही कारमधून मुंबईहून गोकाक (बेळगाव) येथे लग्नासाठी निघाले होते. भरधाव स्विफ्ट कारने पुढे चाललेल्या मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. अभिषेक उत्तम देसाई (वय.२८,कारचालक, रा.२,व्ही,१०४,अग्निशामक दल, देवनार,गोवंडी, मुंबई), विक्रम वसंत माने (वय.२८,रा.गोकाक,जि. बेळगाव) आणि राजाराम मोहन पालकर (वय.२४,रा.पिंगोळी,शेतकरी वाडी,ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अपघातात ठार झालेल्‍या युवकांची नावे आहेत. 

कारने चालत्या ट्रकला मागून धडक दिल्‍याने कार काही अंतर ट्रकसोबत फरफटत गेली. या भीषण अपघातात अभिषेक, राजाराम आणि  विक्रम माने यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी व हॉटेलमधील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली.