Wed, Jan 23, 2019 04:29होमपेज › Satara › कार पलटी होऊन तीन जखमी

कार पलटी होऊन तीन जखमी

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:26PM

बुकमार्क करा
भुईंज : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बदेवाडी, ता. वाईनजीक बुधवारी सायंकाळी स्विफ्ट कार दुभाजक तोडून पलटी झाल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे जखमी झाले.

महादेव गायकवाड सौ. लक्ष्मी गायकवाड व त्यांचा मुलगा अक्षय गायकवाड हे स्विफ्ट कार क्र. एम. एच. 43 एबी 9845 ने कोल्हापूरकडे जात होते. त्यावेळी बुधवारी सायंकाळी बदेवाडी, ता. वाई गावानजीक चालक असलेल्या अक्षयचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजक तोडून 30 फूट अंतरावर जाऊन पलटी झाली.

अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात गायकवाड कुटुंबीय जखमी झाले आहे. पुढील तपास हवालदार अवघडे करत आहे.