Fri, Jul 19, 2019 07:23होमपेज › Satara › कुंभारमळवी पुलावर अपघात, चालक जखमी(व्हिडिओ)

कुंभारमळवी पुलावर अपघात, चालक जखमी(व्हिडिओ)

Published On: Dec 04 2017 2:41PM | Last Updated: Dec 04 2017 2:41PM

बुकमार्क करा

कातरखटाव : वार्ताहर 

सार्वजनिक बांधकाम विभागाची खडी घेऊन जाणारा ट्रक (क्र. एम. एच. ११ ए. एल १८४१) पटली होऊन झालेल्‍या अपघातात चालक जखमी झाला आहे. 

रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे मुजविण्यासाठी ट्रक खडी घेऊन कुंभारमळवी पुलावर आला असता. पुलाखाली पाणी असल्याने व ट्रक खूपच अवजड असल्याने पुलावरील मातीस त्‍याचा बोजा सहन न झाल्याने माती खचून ट्रक पाण्यात पडला. चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, त्‍याला किरकोळ दुखापत झाली आहे.