Wed, Nov 14, 2018 19:21



होमपेज › Satara › महिलेचा स्टोल दुचाकीत अडकल्याने अपघात

महिलेचा स्टोल दुचाकीत अडकल्याने अपघात

Published On: May 18 2018 3:32PM | Last Updated: May 18 2018 3:32PM



सातारा : प्रतिनिधी

येथील जुना आरटीओ चौकात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून निघालेल्या महिलेचा स्टोल चाकात अडकला. यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व भीषण अपघात होऊन महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना बाजूला घेतले व उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. 

अपघातानंतर परिसरात व मुख्यरस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. 

 

Tags : accident, satara,  women