Mon, Nov 19, 2018 16:50होमपेज › Satara › सातारा :  महामार्गावर बदेवाडी येथील अपघातात एक ठार 

सातारा :  महामार्गावर बदेवाडी येथील अपघातात एक ठार 

Published On: Jan 13 2018 1:06PM | Last Updated: Jan 13 2018 1:06PM

बुकमार्क करा
ओझर्डे : वार्ताहर 

महामार्गावरील बदेवाडी गावच्या हद्दीतील पद्मावती मंदिरासमोर दुचाकीच्या अपघातात एका अल्पवयीन तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  शुक्रवारी राञी 12 वाजण्याच्या सुमारास रोहन कृष्णात शिंदे (वय 16 )हा युवक दुचाकी क्र एमएच 11 एस 4978 वरून मालदेववाडी गावाकडे भरगाव वेगात जात होता. त्याचा गाडीवरून ताबा सुटल्याने गाडी स्लीप झाली. तो सर्वीस रोडवर पडल्याने गंभीर जखमी  झाला. त्याला भुईज पोलिसांनी उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या अपघाताची नोंद भुईज पोलिस ठाण्यात झाली असून त्याचा अधिक तपास हवालदार चंद्रकांत मुंगशे करीत आहेत.