Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Satara › फलटण येथे दुचाकीच्या अपघातात एक ठार 

फलटण येथे दुचाकीच्या अपघातात एक ठार 

Published On: Mar 07 2018 8:14PM | Last Updated: Mar 07 2018 8:14PMफलटण : प्रतिनिधी 

महाड-पंढरपूर रोडवर बरड गावच्या हद्दीत दोन मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार  झाला असून, एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी 6 च्या दरम्यान बरड येथे मळवलीचे (ता.माळशिरस, जि. सोलापूर)  माजी सरपंच बापूराव विठोबा ढेंबरे (वय, 52)हे जागीच ठार झाले आहेत.  

ढेंबरे एमएच  45- जी - 6047 या दुचाकीवरून नातेपुते येथून बरडकडे येत होते. यावेळी दुसऱ्या मोटारसायकलवरून एमएच 45- वाय - 5099 वरील या दोन्हीं मोटारसायकलची धडक  झाली यामध्ये ढेंबरे जागीच ठार झाले.