Sat, Nov 17, 2018 00:01होमपेज › Satara › सातारा : दुचाकी अपघातात एक जण ठार

सातारा : दुचाकी अपघातात एक जण ठार

Published On: May 24 2018 10:40AM | Last Updated: May 24 2018 10:40AMपरळी (जि. सातारा): प्रतिनिधी

सातारा एमआयडीसी येथून कामावरून घरी परतत असताना पोगरवाडी फाट्यानजीक समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने कुरुण (ता. सातारा) येथील एक जण जागीच ठार झाला तर,  एक जण जखमी झाला आहे. विकास चंद्रकांत जाधव (वय, ३२) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर, प्रदीप बाबुराव देशमुख (वय, २५) असे जखमी झालेल्‍याचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

विकास आणि प्रदीप सातारा एमआयडीसीत काम करून काल (दि. २३ मे) रात्री ९ च्या सुमारास घरी येत होते. त्‍यांची दुचाकी पोगरवाडी फाट्यानजीक आली असता समोरून येणाऱ्या जीपने त्‍यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, विकासचा जागीच मृत्‍यू झाला तर, प्रदीप गंभीर जखमी झाला. जखमी प्रदीपला तात्‍काळ जिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags : satara district, accident