Wed, May 22, 2019 21:10होमपेज › Satara › सातारा : महामार्गावरील अपघातात पाच जण गंभीर

सातारा : महामार्गावरील अपघातात पाच जण गंभीर

Published On: Jan 13 2018 12:28PM | Last Updated: Jan 13 2018 12:28PM

बुकमार्क करा
ओझर्डे : वार्ताहर 

महामार्गावरील सुरुर गावच्या हद्दीत व्हेगनर गाडीच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे तेथे उभ्या असलेल्या डंपरवर जाऊन आदळला. या अपघातामुळे  डंपर पलटी झाल्याने त्यातील पाच जण गंभीर जखमी झाले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  व्हेगणर गाडी क्र एमएच 05 डी  एच 1909 मधील पाचजण  रा.अंबरनाथ हे सर्वजण शुक्रवारी सांगली येथील आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले होते.  ते पुन्हा अंबरनाथकडे जात होते. 

यावेळी राञी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी महामार्गावरील सुरुर गावच्या हद्दीतील ऊड्डान पुलावरून जात होती. गाडी पुलावर आाली असताना चालक भरत सोनलकर यांचा गाडी वरील ताबा सुटला. यामुळे गाडी सर्वीस रोडवर उभ्या असलेला डंपर क्र एमएच 11 बीके 3429 यावर जाऊन आदळली. 

या अपघातात गाडी पलटी होवून 5 जण गंभीर जखमी झाले. भुईज पोलिसांनी त्यांना उपचारासाठी वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद भुईज पोलिस ठाण्यात झाली आहे.

वाचा इतर महत्त्‍वाच्या बातम्या

सांगलीतील अपघाताने महाराष्‍ट्र हळहळला; ६ पैलवानांचा मृत्यू

मुलुंडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; हल्‍ल्यात ७ जखमी(व्‍हिडिओ)

कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर ईडीचे छापे

सण पत्नीचा...संक्रांत पतीराजावर! 

प्रसारमाध्यमांवर ७२% भारतीयांचा विश्‍वास!