Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Satara › गजवडी फाट्यावर गाडीतून पडल्याने एकाचा मृत्यू 

गजवडी फाट्यावर गाडीतून पडल्याने एकाचा मृत्यू 

Published On: Jul 08 2018 11:01PM | Last Updated: Jul 08 2018 11:04PMपरळी : वार्ताहार 

राजापुरी (ता.सातारा) येथील विजय कोंडीबा साळुंखे (वय-45) हे गजवडीतून चारचाकी वाहनाला मागे लटकून घरी जात असताना हात सुटल्याने जमिनीवर आपटले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय साळुंखे हे गंवडी काम करत होते. आज कामाला सुट्टी असल्याने ते बाजारासाठी परळी येथे गेले होते. तेथून बाजारघेऊन गजवडी फाटा येथे आले. एका चारचाकी वाहनाच्या पाठीमागे लटकून घरी जात असताना परिसरात पाऊस असल्याने त्यांचा हात सटकला यात जागेवर पडून त्यांना मृत्यू झाला. ही घटना रात्री 8.30 च्या सुमारास घडली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.