Mon, Nov 19, 2018 00:55होमपेज › Satara › विद्यार्थ्याची आत्महत्या

विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:43PMनागठाणे : वार्ताहर

नागठाणे (ता. सातारा) येथे आकाश नंदकुमार सुतार (वय 23, मूळ राहणार वैराग, ता. माढा, जि. सोलापूर, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा), या मेडिकलच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बीएचएमएसच्या  फायनल परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून ही घटना घडली.

आकाश सुतार हा येथील डॉ. भानुदास सुतार यांचा चुलत भाऊ आहे. तो बी.एच.एम.एस.च्या शेवटच्या वर्षात शिकत होता.नुकतीच त्याने परीक्षा दिली होती.शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये आकाशला अपयश आल्याचे समजते. त्यामुळे तो निराश झाला होता. चुलत भाऊ डॉ. भानुदास यांनी याबाबत त्याला समजावूनही  सांगितले होते. दरम्यान, नैराश्यातूनच शुक्रवारी रात्री उशिरा आकाशने नागठाणे येथील सासपडे चौकात असणार्‍या डॉ. भानुदास सुतार यांच्या रुग्णालयात छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.