Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Satara › सातारा :  रेठऱ्यात ट्रॅक्टरखाली सापडल्याने मुलगा ठार

सातारा :  ट्रॅक्‍टरखाली सापडून मुलाचा मृत्यू

Published On: May 25 2018 8:23PM | Last Updated: May 25 2018 8:22PMकराड : प्रतिनिधी 

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे शेतात गेलेल्या मुलाचा ट्रॅक्‍टरखाली सापडून मृत्यू झाला. यश भरत मोहिते (वय ६) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. 

यश हा आपल्या नातेवाईकांसोबत टेकडी नावाच्या शिवारात गेला होता. त्यावेळी तो ट्रॅक्टरखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला सायंकाळी सहाच्या सुमारास उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात आणण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात झाली नव्हती.