होमपेज › Satara › जुळेवाडीतील जवान बेपत्ता

जुळेवाडीतील जवान बेपत्ता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

श्रीनगर येथे सैन्य दलातीलर वायरलेस विभागात कार्यरत असलेले जुळेवाडी (ता. कराड) येथील जवान अक्षय संजय सोमदे (वय 24) हे बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने कराड शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अक्षय सोमदे हे काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी जुळेवाडी येथे आले होते. सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर सैन्य दलात पुन्हा हजर होण्यासाठी ते 30 मार्च रोजी घरातून बाहेर पडले. नातेवाईकांनी रात्री कोल्हापूर नाक्यावरील खासगी  ट्रॅव्हल्समधे त्यांना बसवले होते.

दुसरे दिवशी 31 मार्च रोजी ते सकाळी मुंबई येथे पोहचले. त्यावेळी त्यांचा कुटुंबियांना फोन केला होता. मात्र त्यानंतर ते श्रीनगर येथे पोहचलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची खबर त्यांची पत्नी सायली अक्षय सोमदे यांनी सोमवारी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली.

Tags : satara, satara news, Youth soldier, missing, Julewadi,


  •