Thu, Apr 18, 2019 16:37होमपेज › Satara › बारावीचा पेपर देऊन परतणारा युवक अपघातात ठार 

बारावीचा पेपर देऊन परतणारा युवक अपघातात ठार 

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 23 2018 11:52PMतळमावले : वार्ताहर

बारावीचा मराठीचा पेपर देऊन घरी परत जात असताना मोटारसायकलला अपघात होऊन मोरेवाडी (ता. पाटण) येथील युवक ठार झाला. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी होती. प्रथमेश परशराम पाटील (रा. मोरेवाडी पाटील वस्ती, कुठरे, ता. पाटण) असे युवकाचे नाव आहे. 

इयत्ता बारावी कॉमर्समध्ये तो शिकत होता. शुक्रवारी मराठी विषयाचा पेपर होता. पेपर देऊन घरी परतत असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. रस्त्याकडेला जखमी अवस्थेत तो पडला होता. त्याला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा तो विद्यार्थी होता. 

पाचुपतेवाडी (गुढे) ता.पाटण नजीक वळणावर त्याचा अपघात झाला. अपघातानंतर दोन तासांनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले तो पर्यंत त्यांना याची कसलीच माहिती नव्हती. अपघात कशाने झाला याचीही माहिती यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती.