Fri, Sep 21, 2018 13:16होमपेज › Satara › मालट्रकच्या धडकेत वाठारचा युवक ठार 

मालट्रकच्या धडकेत वाठारचा युवक ठार 

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 10:46PMकराड : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत मालट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री 11.45 च्या सुमारास हा अपघात घडला.जखमींवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पांडुरंग राजाराम गायकवाड (वय 28 वर्ष, रा. वाठार) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर बाळू साठे (वय 60) व प्रकाश शामराव भोसले (वय 26. दोघे रा. मालखेड) अशी जखमींची नावे आहेत. यातील बाळू साठे यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हे तिघे गुरुवारी रात्री मोटारसायकल वरून घरी जात असताना 11.45 च्या सुमारास महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत मालट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत हे तिघे युवक मोटरसायकलसह नाल्यात जाऊन पडले. धडकेनंतर ट्रकचालक न थांबता निघून गेला. वाहनांच्या आवाजाने वाठारमधील काही युवक घटनास्थळी धावले. जखमींना तत्काळ खासगी वाहनाने उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात हलविले. यातील पांडुरंग गायकवाड याचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला.  तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र एक्के अधिक तपास करत आहेत. 

Tags : Satara, Youth, killed, truck, accident