Fri, May 24, 2019 21:15होमपेज › Satara › ‘युथ’ स्पर्धेमुळे समाज प्रगल्भ होईल

‘युथ’ स्पर्धेमुळे समाज प्रगल्भ होईल

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी

युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून व त्यांचे विचार ऐकूण येणारी पिढी प्रगल्भ असेल यात शंकाच नाही. त्यातूनच उद्याचा देश व  महाराष्ट्र घडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, सातारचे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील हे स्मार्ट असून त्यांच्या स्मार्ट कामाचीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलखुलासपणे प्रशंसा केली.

जिल्हा  परिषदेच्या  स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप अंतिम स्पर्धा व आय. एस. ओ. मानांकित पोलिस ठाण्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी  मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना. विजय शिवतारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आदी मान्यवर उपस्थित होते.

अलिकडच्या काळात पोलिस हे तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याने गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढले आहे. सातारा पोलिस दलातील सर्व पोलिस ठाणी आयएसओ मानांकित झाल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या गडचिरोली येथील कार्याचा उल्लेख करून तसेच काम सातारा येथे केल्याने त्यांचे अभिनंदनही केले.

युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या शालेय गटातील स्पर्धक विजेत्यांमध्ये सुलाखे हायस्कूल बार्शीने प्रथम,पोदार हायस्कूल सांगलीने द्वितीय, बापूजी साळुंखे विद्यालय असवली, वाईने तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन स्तरावर केबीपी इस्लामपूरने प्रथम, डॉ. डी. वाय. पाटील, आकुर्डीने द्वितीय, किसनवीर महाविद्यालय, वाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बक्षिसे जाहिर होताच स्पर्धकांनी एकच जल्लोष केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले.