Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Satara › कराड : युवा विकास प्रतिष्ठान समता रॅली

कराड : युवा विकास प्रतिष्ठान समता रॅली(व्हिडिओ)

Published On: Aug 15 2018 11:41AM | Last Updated: Aug 15 2018 11:41AMकराड : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कराड (जिल्हा सातारा) येथे बुधवारी सकाळी युवा विकास प्रतिष्ठान यांच्याकडून दत्त चौक ते चावडी चौक या मुख्य बाजारपेठेत सामाजिक ऐक्याचा संदेश देत समता रॅली काढण्यात आली. या रॅलीवेळी देशाच्या रक्षणाची शेकडो विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

विठामाता विद्यालय, शिवाजी विद्यालय, पालकर हायस्कूल, मलकापूरमधील रोटरी शाळा, शिवराय ट्रेकिंग ग्रुप, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक फारुख पटवेकर, अतुल शिंदे, कराडचे माजी आरोग्य सभापती नगरसेवक विजय वाटेगावकर, विलासराव पाटील पोतलेकर यांच्यासह कराडमधील आजी-माजी नगरसेवक, विद्यार्थी, शिक्षकांसह ज्येष्ठ नागरिकही या समता रॅलीत सहभागी झाले होते. 

चावडी चौकात या रॅलीची सांगता झाली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी देशाच्या रक्षणाची शपथ घेतली. तसेच 1962, 1965 आणि 1971 या तीन युद्धात सहभागी होणाऱ्या सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल एम. डी. कुलकर्णी यांचाही यावेळी यथोचित गौरव करण्यात आला.