Sun, Aug 25, 2019 19:44होमपेज › Satara › लिम्का बुकमध्ये यशेंद्र क्षीरसागर यांच्या कवितेची नोंद 

लिम्का बुकमध्ये यशेंद्र क्षीरसागर यांच्या कवितेची नोंद 

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 11:33PMसातारा : प्रतिनिधी 

येथील कवी यशेंद्र क्षीरसागर यांच्या दीर्घकवितेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी कविता म्हणून नोंद झाली आहे. तसे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्राप्‍त झाले आहे.

 यशेंद्र क्षीरसागर यांनी ही कविता भारतीय संस्कृती या विषयावर लिहली आहे. या कवितेत 3068 ओळी आणि 13292 शब्द आहेत. यापूर्वी हे रेकॉर्ड आसामी भाषेच्या नावावर होते. हा विक्रम मोडून क्षीरसागर यांनी तो मराठीच्या नावावर केेला आहे. या कवितेचे पुस्तक जयसिंगपूर येथील कवितासागर या प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. लिम्का बुकचे कार्यालय हरियाणा मधील गुरगाव येथे असून विक्रम यशस्वी झाल्याचा दूरध्वनी क्षीरसागर यांना प्राप्त झाला व प्रमाणपत्रही सन्मानपूर्वक पाठवण्यात आले. या दीर्घकवितेत भारतीय मूल्ये, इतिहास, संस्कार, सुंदर चालीरिती यांचे सविस्तर, अभ्यासपूर्ण वर्णन केले आहे. लिम्का बुकच्या संपादिका वत्सला कौल बॅनर्जी यांच्या स्वाक्षरीसह हा विक्रम झाल्याचे जाहीर केले. मराठी भाषेच्या नावे हा विक्रम झाल्याचा विशेष आनंद असून हे यश तमाम भारतीय कवींना समर्पित करत असल्याचे यशेंद्र क्षीरसागर यांनी म्हटले आहे.